भगवान श्री जिव्हेश्वर आरती
आरती उजळितो तुला । प्रभु श्यामला
जिह्वाजी स्वकुळा । ओवाळू आरती तुजला ।।धृ।।
शिवरसामृत सेवन करूनी । रूप मनोहर सुहास्य वदनी
जिव्हेश्वर नामे अवतरूनी । तोषविले सकळाला ।।१।। ओ.
देव सर्वही लावूनि कामा । वस्त्र बनविसी तु निजधामा
ऐसा तव हा अगाध महिमा । झाकीयले सुरतनुला ।।२।। ओ.
अगणित वस्त्रे बनवूनि राया । झाकीयली अखिलांची काया ।
वसनकला तुज पासुनी सखया । भूवरी ये उद्याला ।। ३ ।। ओ.
बालक तव या अवनी वरती । साळी, कोष्टी, पटवी असती
जरी अज्ञाने तुला विसरती | सौख्यची देई त्यांना ।।४।। ओ.
देह निरंजन करूनी आरती | काम, क्रोध, मद लावूनि वाती
आत्मज्योत ठेवूनि तेवती | विठ्ठल रत पद कमला ।।५।। ओ.